सावंतवाडी प्रतिनिधी: हाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई परिषदेचा २०२५- २६ चा सर्वोच डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार आरोंदा येथील डॉ. कुमभार्स श्री होमिओपथिक क्लिनिकचे डॉ. सुखदेव मारुती कुंभार (एम. डी.) यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ बाहुबली शहा आणि प्रबंधक वि क थानवी यांनी ही निवड जाहीर केली आहे.
डॉ. सुखदेव कुंभार यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीने जाहीर केलेला डॉ. हनिमान जीवन गौरव हा पुरस्कार होमिओपॅथीमधील सर्वोच्च पुरस्कार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून दरवर्षी फक्त ४ डॉक्टरांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. या पुरस्काराची निवड करताना पुरस्कार प्राप्त डॉक्टरांच्या माहितीसह त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती तसेच त्यांची जनमानसातील प्रतिमा आणि होमिओपॅथीमधील त्यांचे कार्य या सर्व गोष्ठी तपासल्या जातात.
डॉ. सुखदेव कुंभार हे गेली ३५ वर्षे आरोंदा येथे होमिओपॅथी वैद्यकीय सेवा बजावत आहे. तसेच गोवा पर्वरी २०१२ पासून गेली १३ वर्षे त्यांचे क्लिनिक असून ते तसेच डॉ शुभम रुग्णांना सेवा देत आहेत. डॉ. सुखदेव कुंभार यांचे होमिओपॅथीमधील शिक्षण एल. सी. इ. एच. हे डिग्री १९८६ मध्ये बेळगावात झाले. तर एम.डी. डिग्री २०१० साली नवी मुंबईत खारघर येथे झाले. त्यांच्या आरोंदा येथील क्लिनिक मधून कॅन्सर, किडनी फेल्यूअर, त्वचेचे सर्व विकार, वंधत्व अशा अनेक असाध्य व्याधीवर यशस्वी उपचार केले जातात. होमिओपॅथीमधील त्यांच्या या सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीने त्यांना डॉ. हनिमान जीवन गौरव हा पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल डॉ. सुखदेव कुंभार यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.