Home शिक्षण डॉ. राम मेस्त्री देवरुख कॉलेजचे भूषण..! प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांचे प्रतिपादन.

डॉ. राम मेस्त्री देवरुख कॉलेजचे भूषण..! प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांचे प्रतिपादन.

80

देवरुख प्रतिनिधी: डॉ. राम मेस्त्री हे देवरुख कॉलेजचे माजी विद्यार्थी असून त्यांनी मराठी साहित्यात मानाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. हा केवळ आज त्यांच्या ज्ञातीबांधवांचा सन्मानासोबतच आमच्या देवरुख कॉलेजचा देखील सन्मान आहे, असे प्रतिपादन देवरुख कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अध्यक्षीय पीठावरून बोलताना केले.

संगमेश्वर तालुका पांचाळ सुतार समाज संघाने लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय देवरुख येथे डॉ. राम मेस्त्री यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर-चिपळूण मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तेंडोलकर पुढे म्हणाले, राम मेस्त्री प्रशासनात वरिष्ठ राजपत्रित अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना गेली ३५ ते ४० वर्षे अपूर्व अशी अखंडितपणे साहित्य सेवा करीत आले आहेत. हे सातत्य आणि परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. म्हणून त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा गौरव म्हणून साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी (यूएसए) या विश्वविद्यापीठातून त्यांना मानाची डॉक्टरेट इन लिटरेचर पदवी बहाल झाली आहे. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. डॉ. राम मेस्त्री हे आमचे देवरुख कॉलेजमधून इयत्ता नववीपासून साहित्य सेवा बजावत आलेले असून त्यावेळी त्यांना गुरुवर्य ए. के. जोशी आणि गुरुवर्य धुंडिराज रुके यांचे मोलाचे साहित्य धडे मिळालेले आहेत. त्यानंतर त्यांना आमचे महाविद्यालयात शिक्षण  घेत असताना साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश जोशी सर आणि ज्येष्ठ समीक्षाकार प्रा. डॉ. मुकुंद पेंडसे यांचे अनमोल असे साहित्यिक मार्गदर्शन झालेले आहे. आजवर डॉ. मेस्त्री यांनी सुमारे ३१ पुस्तकांचे लेखन केलेले असून त्यात कविता, कथा, नभोनाट्य, एकांकिका, श्रुतिका, बालनाट्य, लोकनाट्य, तीन अंकी नाटक, वैचारिक लेख, ललित लेख, कादंबरी, कृषी यशोगाथा, पर्यटन संहिता, विभूतीपरिचय कथा, गौरव ग्रंथ, विश्वकर्मा महापुराण, यांचा समावेश आहे. तसेच महाराज थिबा आणि त्यांचे राज परिवार यांच्या दुर्दैवी आयुष्यावर सुमारे ८०० पानांची कादंबरी लिहिली असून ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. राम मेस्त्री यांची वीस पुस्तके मुद्रित होऊन प्रकाशित झालेली आहेत. उर्वरित प्रकाशनासाठी सज्ज आहेत. आजही शासकीय अधिकारी सेवा बजावताना अहर्निश अशी साहित्य सेवा खरोखरच स्पृहणीय आहे, असे गौरवोद्गार प्रा. डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी याप्रसंगी काढले.

प्रमुख पाहुणे आमदार शेखरजी निकम यांनी, डॉ. राम मेस्त्री हे आपल्या समाजासाठी एक आदर्श ठरतील असे गौरवोद्गार काढले. आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते डॉ. राम मेस्त्री यांच्या कार्यकर्तृत्वावर काढलेला आणि दैनिक राजतंत्र पालघरचे संपादक मंगेश तावडे यांनी संपादित केलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन आणि पांचाळ सुतार संघ संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष राजेश मोगरोणकर यांनी संपादित केलेल्या  डॉ. राम मेस्त्री साहित्यातील साहित्यिक राम या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष धामणस्कर, प्रमोद अधटराव (भाजप नेते), डॉ. नरेंद्र तेंडोलकर (प्राचार्य देवरूख कॉलेज), एसीपी विजय पांचाळ, दैनिक राजतंत्रचे संपादक मंगेश तावडे उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने जण समुदाय उपस्थित होता.