Home स्टोरी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण...

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन!

47

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): गेल्या १४ वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर कल्याण पूर्वेतील आंबेडकरवादी समाजाच्या स्पप्नाची पूर्तता होत असून कल्याण पूर्वेत निर्माणाधीत असलेल्या आंबेडकर स्मारकात बसविण्यात येणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे येत्या १२ एप्रिल २०२३ रोजी जल्लोषात आगमन होत आहे .कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ड कार्यालयाजवळील भूखंडावर गेल्या वर्षी १२ एप्रिल २०२२ रोजी आंबेडकर स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन तद्कालिन ठाणे जिल्हा पालक मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते . या स्मारकाचे काम ३०० दिवसांचे आत नियोजित होते . परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर डोंगर फोडून जमिन अधिगृहीत करण्यास बरेच दिवस लागल्याने स्मारकाचे बांधकाम उशीरा सुरु झाल्याने सद्य स्थितीत नियोजित स्मारक इमारतीचे बांधकाम हे ५० ते ६० टक्केच पूर्ण झाले असले तरीही या स्मारकात स्थापन करावयाच्या पुतळ्याचे काम मात्र खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने शंभर टक्के पुर्ण झाले आहे .

आंबेडकरी जनतेच्या भावनांचा विचार करता पुर्णत्वात निर्माण झालेला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा सुमारे २ टन वजनाचा पुतळा आंबेडकर जयंतीच्या पार्शभूमीवर येत्या १२ एप्रिल २०२३ रोजी स्मारक स्थळी आणण्याचे नियोजन असल्याचे स्मारक समितिचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांनी सांगितले असून कल्याण नगरीत येणाऱ्या या पुतळ्याची पत्री पूल ते प्रभाग ड कार्यालय – स्मारक स्थळापर्यंत वाजत गाजत आणि मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे .१२ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या दरम्यान आंबेडकर जयंती निमित्त कल्याण पूर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने भिमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या भिमोत्सवात आगमन झालेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तमाम आंबेडकरी जनतेला अभिवादन करता येणार आहे . त्या नंतर हा पुतळा स्मारकाचे नियोजित काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवण्यात येणार असल्याचे पालिका स्तरावरील प्रकल्प अधिकारी श्री . रवी अहिरे आणि शशीम केदारे यांनी सांगितले . विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्वच्या या वर्षीच्या महिला अध्यक्षा आयु . सिंधुताई मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साजऱ्या होणाऱ्या आंबेडकर जयंती उत्सवा दरम्यानच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक स्थळी आगमन होत असल्याने महिला वर्गाकडून महिला विरहीत असलेल्या स्मारक समितीचे अभिनंदन केले जात आहे .