Home स्टोरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने सम्राट अशोकाची जयंती उत्साहात साजरी!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने सम्राट अशोकाची जयंती उत्साहात साजरी!

175

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म संपूर्ण विश्वात पसरविण्याचा वसा घेतलेल्या सम्राट आशोक यांच्या जयंती दिनी आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आयु. सिंधुताई मेश्राम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार्वतीबाई मॅरेज हॉल मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात करावके च्या माध्यमातून स्थानिक गायक – गायकांनी बुद्ध भिम गिते गावून उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयु.चंद्रकला ताई मुजमुले यांनी आपल्या छोटेखानी व्याख्यानात सम्राट अशोकाच्या जिवन पटावरील अनेक पैलु उलगडवत सम्राट अशोकाच्या कार्याची जाण उपस्थितांना करुन दिली. गेल्या वर्षीचे अध्यक्ष केतन रोकडे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही जयंती उत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या संविधान गौरव परिक्षेतीत उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक – पुर्वा बाळू पगारे, द्वितीय – सारिका नारायण रींगे तृतीय क्रमाक तनिष्का तानाजी जाधव या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५, ३ व २ हजार रुपयांचे रोख पारितोषीक आणि सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.


दलित मित्र अण्णा रोकडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या कार्यक्रमास उद्योजक मिलींद बेळमकर हे विशेष अथिती म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधान गौरव स्पर्धा यशस्वी करणाऱ्या अनेक समाज बांधवांचा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लताताई वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.