Home स्टोरी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणातील सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणातील सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

142

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्‍याचा अर्ज सादर केला आहे. त्‍यामुळे संशयितांचे म्‍हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्‍यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील. या प्रकरणी ५ जणांच्‍या विरोधात आरोप निश्‍चित केले होते; मात्र संशयितांनी गुन्‍हा मान्‍य नसल्‍याचे न्‍यायालयाला सांगितले. त्‍यांच्‍या विरोधात १३ पुरावे सीबीआयच्‍या वतीने न्‍यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ सप्‍टेंबर या दिवशी होणार आहे.