डॉ. दा. भ. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये चेतन गाला वय वर्ष ५४ या व्यक्तीने आज दिनांक २४ मार्च २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास हातातील चाकूने शेजारी राहणाऱ्या काही लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत एकूण पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तीना एच. एन. रिलायन्स आणि नायर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी सदर व्यक्ती ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या घटनेचा थरारक विडिओसध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे.