Home स्पोर्ट “डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर आणि कुटुंबीयांचे कार्य उल्लेखनीय!” कारागृह...

“डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर आणि कुटुंबीयांचे कार्य उल्लेखनीय!” कारागृह अधिकारी श्री.संजय मयेकर.

243

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आणि कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मोफत कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचे सावंतवाडी कारागृह अधिकारी श्री. संजय मयेकर यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयाना शेजारी मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कॅरम शिबीरात सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, कणकवली तालुक्यातील पासष्ट आणि बुदधिबळ शिबीरात ऐशी मुला-मुलींनी सहभाग घेतला. विदयार्थ्यांना ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडुंचे मार्गदर्शन लाभले.यावेळी मान्यवरांकडून ॲकेडमीचे राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, यश सावंत, गार्गी सावंत आणि राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदुरकर, यशराज गवंडे यांचा गौरव करण्यात आला.

श्री.संजय मयेकर यांचे स्वागत करताना सौ.स्नेहा पेडणेकर, शेजारी श्रीमती अनुपमा शेटगे, कु.बाळकृष्ण पेडणेकर, श्री.कौस्तुभ पेडणेकर

यावेळी श्री.संजय मयेकर म्हणाले, “ॲकेडमीचे विदयार्थी-विदयार्थिनी आठ वर्षे कॅरम, बुदधिबळ, टेबल टेनिसच्या शालेय व असोसिएशनच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकप्राप्त आहेत.तसेच मुक्ताई ॲकेडमी राज्यातील बेस्ट ॲकेडमी म्हणुन गौरवांकीत आहे हे कौतुकास्पद आहे.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचे क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.त्यांचे सुपुत्र श्री.कौस्तुभ पेडणेकर व सौ.स्नेहा पेडणेकर, बाळकृष्ण पेडणेकर हा वारसा पुढे चालवत आहेत.”

यावेळी ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी बुदधिबळ व कॅरम स्पर्धा घेण्याचे जाहीर केले.आभार प्रदर्शन उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले.