Home क्राईम डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांकडुन अटक

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांकडुन अटक

139

सावंतवाडी प्रतिनिधी: कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 323/2025 भा.न्या.सं.2023 चे कलम 318(4), 3 (5) सह आयटी अॅक्ट 66 क, ड येथे डिजिटल अरेस्ट संबंधी दि.30/11/2025 रोजी दाखल असुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी यांची 12,00,000/- ची आर्थिक फसवणुक झाली होती. सदर गुन्हयाचा तपास कणवकली पोलीस ठाणे करत होते. मा. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला.

 

सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मा.अपर पोलीस अधीक्षक, कु. नयोमी साटम यांनी मार्गदर्शन केले.cसदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी मा. प्रवीण कोल्हे यांनी साबयर पोलीस ठाणेचे तपास पथक नियुक्त केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ तपास पथक गोरखपुर उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आले.

 

सदर गुन्हयातील संशयित इसम सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता, वय 33 वर्ष, शिक्षण 12 वी व्यवसाय- हर्बल प्रोडक्ट विक्री, मुळ रा पो गोमरिया, ता. हाटा, जि. कुशीनगर, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. राम नक्षत्र प्रसाद यांचे घर, पार्वती नगर, झारखंडी मंदिर, कुडाघाट, जि. गोरखपुर, राज्य उत्तरप्रदेश, 9198141528, आधार 738919948067, ईमेल- kumarguptasiddhartha@gmail.com यास गोरखपुर उत्तरप्रदेश या ठिकाणी ताब्यात घेतले. आतापर्यंत झालेल्या तपासात अथक प्रयत्न करुन अपहारीत रक्कमेपैकी 100% रक्कम रु.12,00,000/- गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे.

 

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, सिंधुदुर्ग मा. अपर पोलीस अधीक्षक, कु.नयोमी साटम, मा.घनश्याम आढाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रवीण कोल्हे यांनी या तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोउनि/गणेश क-हाडकर, पोहेकॉ योगेश सातोसे पोहेकॉ/सागर भोसले, पोकॉ/ स्वप्निल तोरस्कर सायबर पोलीस ठाणे यांचे मार्फतीने पुर्ण केलेली आहे.

 

सदर तपास पथकास विशेष सहकार्य सपोनि/नितीन पुरळकर, मपोकॉ/धनश्री परब, पोना/ फ्रिडन बुथेलो, पोकॉ/प्रथमेश गावडे, मपोको/निकीता परब, मपोकॉ/स्नेहल जावकर, पोकॉ/ऋषिकेश गुरव, पोकों/युवराज भंडारी सायबर पोलीस ठाणे यांनी केलेले आहे.