ठेकेदार, अधिकारी व सत्ताधारी यांच्या भ्रष्टाचाराच कुरण बनलेल्या आंबोली घाट प्रश्नी माजी नगराध्यक्ष साळगांवकर यांच्या लढ्याला मनसेचा पाठिंबा: अँड. अनिल केसरकर
सावंतवाडी: आंबोली घाट प्रश्नी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी चालू केलेला लढा योग्य असून साळगावकर यांच्या या भूमिकेला मनसे पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. या घाट मार्गावर व पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर व पर्यटन स्थळांवर आतापर्यंत करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास अनेक अधिकारी अडचणीत येणार आहेत. बबन साळगांवकर यांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम हाती घेतलं असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी या भ्रष्टाचारात हात अडकलेल्या मंडळीकडून देण्यात आल्याचे बबन साळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रकार म्हणजे जनतेचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न असून लोकप्रतिनिधींना अशा धमक्या देण्यात येत असतील तर अधिकारी किती माजलेले आहेत याचा अंदाज येतो. तरी अशा पोकळ धमक्यांना भीक न घालता साळगांवकर यांनी आपलं आंबोली घाटातील भ्रष्टाचारा बाहेर काढण्याचं काम चालू ठेवावं मनसे सर्व शक्तीनीशी त्यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहॆ.