Home क्राईम ठाणे विभागात साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे!

ठाणे विभागात साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे!

147

ठाणे: ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात गेल्‍या साडेपाच महिन्यात लाचखोरीचे ५० गुन्‍हे नोंद झाले आहेत. या गुन्‍ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्‍यांसह एकूण आरोपींची संख्‍या ७० आहे. एकाही गुन्‍ह्यामध्‍ये न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍यात आलेले नाही. ४९ गुन्‍हे हे तपासाधीन आहेत. गेल्‍या वर्षीपेक्षा ही संख्‍या ११ ने वाढली आहे.राज्‍यात १ जानेवारी ते ११ जून या कालावधीत ३५० हून अधिक जास्‍त लाचखोरीचे गुन्‍हे नोंद झाले आहेत. नाशिक -८०, पुणे – ६८, छत्रपती संभाजीनगर – ६६ अशी संख्‍या आहे.