संपादकिय ✍️: महानगरपालिका निवडनुका झाल्या, निकाल लागला आणि लगेच आज ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. उबाठा सेनेचे संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज एका तारांकित हॉटेल मध्ये भेट झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि मुंबई शिवसेनेकडेच राहिली पाहिजे यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र असं झालं तर मतदारांची किंमत हि फक्त मतदान होईपर्यंत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. मतदान होईपर्यंत सर्व पक्षाचे सामान्य कार्यकर्ते पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचं रान करून काम करतात. मोठे वादहि होतात. निवडणूक झाली आणि एकदा निकाल लागला कि मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पुन्हा एकत्र येतात. त्यावेळी सामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि मतदार यांना विचारात घेतलं जात नाही. अर्थात मतदारांना किंमत शून्य असंच चित्र दिसून येतं. हि मतदारांची फसवणूकच आहे. असंही म्हणता येईल. या घाणेरड्या राजकारणामुळे आज सामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास उडत आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट आता जर एकत्र येत असतील तर सर्वसामान्य मराठी माणूस नक्कीच दुखावला जाईल आणि लोकशाहीला कुठेतरी गालबोट लागेल हे नाकारता येणार नाही. तसेच याचा येणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर खूप मोठा परिणाम होईल. आता मुंबईत महापौर शिंदे आणि शिवसेनेचा पाहिजे म्हणून जर काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे यांच्याशी युती करत असतील तर याचे परिणाम जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर दिसून येतील. अर्थातच शिंदे गटाला याचे परिणाम भोगावे लागतील. शिंदे गटाला जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या परिणामांना सामोरे जावं लागेल. हे नाकारता येणार नाही. कारण २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आणि आता जर पुन्हा मुंबईच्या महापौर पदासाठी पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत आले तर हे मात्र एकनाथ शिंदे हे सत्तेचे भुकेलेले आहेत एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी काय पण करू शकतात. अशी विचारधारा सर्वसामान्य जनतेची होणार आहे. साहजिकच याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर होऊ शकतो. अशी चर्चा सुरु आहे.







