लोणावळा: दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सिंधू रनर टीमने उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन हि आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉनची प्रॅक्टिस रन म्हणून पहिली जाते. पुणे आणि मुंबईतील काही रनरनि हा रूट प्रॅक्टिससाठी शोधून काढला, आणि नंतर त्याला टाटा ग्रुप च्या साहाय्याने एका भव्य मॅरेथॉन चे स्वरूप दिले. लोणावळ्यातील उंच उंच डोंगर, अवघड चढण, घनदाट जंगल, अधून मधून येणारे दाटधुके या मुळे हि मॅरेथॉन खूप अवघड आणि रनर ची क्षमता तपासणारी मानली जाते. या वेळेस सिंधू रनर टीम कडून ओंकार पराडकर, महादेव बान्देलकर, नरेश मांडावकर, मिलिंद बागवे, श्वेता गावडे, भूषण पराडकर, विनायक पाटील, मेघराज कोकरे, प्रसाद गोलम, अद्वैत प्रभुदेसाई आणि संतोष पेडणेकर हे रनर सहभागी झाले होते. त्यात काहीजण आपली पहिलीवहिली अल्ट्रा रन पाळणार होते, तर काही अनुभवी अल्ट्रा रनर होते. सिंधू रनर टीम ने काही दिवस आधी दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी मालवण (सिंधुदुर्ग किल्ला) ते सावंतवाडी ६६ किलोमीटर ची आरमार रन अवघ्या ८ तास १६ मिनिटात पार करण्याचा विक्रम केला होता. लोणावळा येथून रात्री १:३० वाजता हि रन चालू झाली, पुढे जाऊन बुशी डॅम, शिवलिंग पॉईंट, आम्ब्य व्हॅली पुन्हा शिवलिंग पॉईंट ते लोणावळा असा हा तब्बल ९४० मीटर उंचीचा ५० किलोमीटर चा रूट ८ तासात पळायचा होता. रात्रीची झोपेची वेळ, काळाकुट्ट काळोख, घाटात येणारे चड उतार, धुके आणि एकट्याने पाळणे या सगळ्या अडचणींवर मत करून टीमने अव्वल स्थान पटकावले, आणि उपस्थित सगळ्या रनिंग टीमचे लक्ष्य वेधले. या मध्ये सहभागी रनर ची कामगिरी खालील प्रमाणे आहे. (एकूण सहभागी रनर १०००)
१ श्वेता गावडे: ३५ किमी: ३ तास २४ मि. ३ रे स्थान
२ मेघराज कोकरे: ३५ किमी. ३ तास २० मि. २५ वे स्थान
३ भूषण पराडकर: ३५ किमी. ३ तास ५९ मि. १८४ वे स्थान
४ विनायक पाटील: ३५ किमी. ३ तास ५९ मि. १८५ वे स्थान
५ अद्वैत प्रभुदेसाई: ३५ किमी ४ तास ९ मि. २३५ वे स्थान
६ प्रसाद गोलम: ३५ किमी. ४ तास २२ मि. ३१३ वे स्थान
७ संतोष पेडणेकर: ३५ किमी. ४ तास ३५ मि. ४४१ वे स्थान
८ ओंकार पराडकर: ५० किमी. ५ तास ३४ मि. २१२ वे स्थान
९ मिलिंद बागवे: ५० किमी. ५ तास ३७ मि. २३१ वे स्थान
१० नरेश मांडावकर: ५० किमी. ५ तास ४३ मि. २६९ वे स्थान
११ महादेव बान्देलकर: ५० किमी. ५ तास ४७ मि. २९६ वे स्थान
वरील उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, दैनिक कोकण साद, सर्व पत्रकार बंधू, डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी चे प्राचार्य), विनायक कोंडल्याळ (महालक्ष्मी तथास्तु मॉल सावंतवाडी), प्रसिद्ध कब्बडी प्रशिक्षक जावेद शेख, पखवाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील, यात किंचित ही शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमिटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.