मसुरे प्रतिनिधी: नाट्यसृष्ठिमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. “उर्मिलायन ” या व्यावसाईक रंगभूमीवरील गाजत असलेल्या नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील कुसबे गावच्या सुनील हरिश्चंद्र यांना तर त्यांची पत्नी निहारिका राजदत्त यांची याच नाटकासाठी ज्यूरि अवार्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निहारिका राजदत्त यांचे माहेर मसूरे देऊळवाडा येथे तर आजोळ मुणगे देवगड येथे आहे. झी गौरव मध्ये या नाटकाला एकूण 11 पुरस्कारपैकी 8 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
निहारिका राजदत्त म्हणाल्या, पहिलं व्यावसायिक नाटक आणि पहिलाच झी गौरव पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. उघड्या डोळ्यांनी बघितलेलं १७ वर्ष उराशी बाळगून ठेवलेलं हे स्वप्न सत्यात उतरलं. “उर्मिला” ने मला आयुष्यात खूप काही दिलं.ज्युरी विशेष झी गौरव अभिनेत्री पुरस्कार” त्यातलं एक आहे. स्पेशल ज्यूरी अवॉर्डच एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण होत. आजवर स्मिता पाटील, शबाना आझमी, मनिषा कोयराला, कोंकना सेन, इरफान खान, मनोज वाजपयी, नवाझुद्दीन यां सारख्या अनेक मातब्बर कलाकारांना ज्युरी अवॉर्ड मिळाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराला वेगळे महत्व आहे. आपलं काम परिक्षकांनी ध्यानी आणि मनी ठेऊन त्याच कौतुक करणे, पुरस्कारांमधे त्याला विशेष एक दर्जा दिला आहे हेच खूप भारी आहे. असे निहारिका म्हणाली.
निहारिका यांचे पती सुनिल हरिश्चंद्र हे कुसबे, कुडाळ येथील मूळ रहिवासी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून पदवीधर आहेत. गेल्या २६ वर्षापासून नाट्यसृष्टीत सातत्याने ते कार्यरत आहेत. १९९७ सालापासून एकांकिकांमधून अभिनयाची त्यांनी सुरुवात केली. कालांतराने लेखन व दिग्दर्शनाची सुरुवात त्यांनी केली. सिनेदिग्दर्शक निर्मल पांडे यांसोबत २ वर्ष नाट्यअभ्यास केला. संवेदना परिवार, अविष्कार (अजित भगत यांसोबत नाटक) कलासाधना, सुरप्रवाह या संस्थांसोबत नाट्य प्रवास झाला आहे.
प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचही लेखन व दिग्दर्शनते करतात.मराठी रंगभूमी सह “हिंदी व गुजराती” रंगभूमीवर यांच्या कलाकृती सादर झाल्या आहेत.नाटक, एकांकिका सह मालिका व चित्रपटांचही लेखन त्यांनी केले आहे. महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिकांमधे अभिनयची पारितोषिक तसेच आंतरराष्ट्रीय एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयचं पारितोषिक मिळाले आहे.
“जंगल-जंगल”, “मंथरमाया”, जिलबी, मनमाया, ही वस्ती सस्ती, कृष्णवीवर, एक अधिक शून्य, शेक्स्पिअर भागिले २०१२, वेळखेळ, “विभावंतर”, “मडवाॅक”, “मानलेली गर्लफ्रेंड”, “उर्मिलायन” अशा अनेक गाजलेल्या एकांकिकांमधून अभिनय व सगळ्या स्पर्धेत लेखन-दिग्दर्शनाची पारितोषिके प्राप्त.
“असुरवेद” या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखक – दिग्दर्शकाच पारितोषिक. “सुख म्हणजे नक्की काय असत” (लेखन), “जाउ द्या ना भाई” व सध्या रंगभूमीवर चालू असलेलं “पाहिले न मी तुला” व “उर्मिलायन” या व्यावसायिक नाटकांच लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे.मोस्ट वेलकम, गोष्ट गौतमची, स्लाईस ऑफ लाईफ ही वेगळ्या शैलीतली नाटकं “तो आणि मी”, “मधू इथे अन चंद्र तिथे” या मराठी चित्रपटांसाठी कथा पटकथा केली आहे.
“लव लग्न लोचा” (३०० भाग),
“जागो मोहन प्यारे” (५० भाग),
“भेटी लागी जिवा” (१५० भाग),
“छोट्या बायोची मोठी स्वप्न” (२०० भाग)मालिकांसाठी पटकथा व संवाद लेखन तर “तेरे घर के सामने” हिंदी व्यावसायिक नाटकाच लेखन व दिग्दर्शन केल आहे.
झी गौरव पाठोपाठ “म.टा . सन्मान पुरस्कार मधे सुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक हि नामांकन जाहीर झाले आहे. निहारिका राजदत्त तांबे ही मसूरे गावचे सुपुत्र पदवीधर शिक्षक तथा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे व शिक्षक सुगंध तांबे यांची पुतणी तर सामाजिक कार्यकर्ते वी. रा. तांबे यांची नात आहे. दोघांच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.