Home स्टोरी झाराप येथील केंद्र शाळेत वर्ग ७ पटसंख्या ६४ शिक्षक मात्र एकच

झाराप येथील केंद्र शाळेत वर्ग ७ पटसंख्या ६४ शिक्षक मात्र एकच

105

तीन महिन्यात दुसऱ्यांदा पालकांचे आज सोमवारपासून शाळा बंद आंदोलन….

 

 

कुडाळ: जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा झाराप नं. येथील इयत्ता सातवी पर्यंत कायमस्वरूपी एकच शिक्षक नियुक्त करण्यात आला आहे.वर्ग सात शिक्षक एक व पटसंख्या ६४ अशा स्थितीत झाराप येथील या शाळेचे शैक्षणिक कामकाज सुरू असल्याचे येथील मुलांची गैरसोय होत आहे. शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील पालकांनी आज सोमवार दि. ९ ऑक्टोबर पासून शाळा बंद छेडण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या पालकांच्या बैठकीत घेतला आहे.गेल्या तिन महिन्यांतील पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडण्याची ही दुसरी वेळ आहे. शिक्षणमंत्री यांच्याच जिल्ह्यात मुलांची शिक्षकांअभावी हेळसांड होत आहे अशा शब्दांत येथील पालकांनी आपली तीव्र प्रतिक्रिया यानिमित्ताने उपस्थित करत याबाबत जिल्हा प्रशासनाचे सोमवारी निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येणार आहे अशी माहिती या शाळेतील पालकांनी दिली आहे.