५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !२ फूटांचे त्रिशूल सापडले !
६ जुलै वार्ता: वाराणसी जिल्हा न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अनुमतीनंतर ४ ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या येथील ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाच्या आजच्या दुसर्या दिवशी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील महिला याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता सुधीर त्रिपाठी यांनी सांगितले, ‘येथील नंदीजवळ व्यासजी यांचे तळघर आहे. ते आज उघडण्यात आल्यावर तेथे मूर्ती सापडली आहे.’ येथे ५ कलश आणि कमळ यांच्या आकृत्याही आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
१. याचिकाकर्त्या सीता साहू यांनी सांगितले की, येथे ४ फूट उंचीची एक खंडित मूर्ती मिळाली आहे. या मूर्तीमध्ये अर्धे शरीर मनुष्याचे, तर अर्धे पशूचे आहे. याला नरसिंहाची मूर्ती म्हटले जात आहे. तसेच येथे तुटलेल्या खांबांचे अवशेषही मिळाले आहेत. तसेच २ फुटांचे त्रिशूळ आणि ५ कलश सापडले आहेत. येथील भागाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
२. अन्य एक याचिकाकर्त्या राखी सिंह यांचे अधिवक्ते अनुपम द्विवेदी यांनी सांगितले की, आजच्या सर्वेक्षणामध्ये मुसलमान पक्षाकडून सहकार्य केले जात आहे. पुरातत्व विभाग बारकाईने सर्वेक्षण करून नोंदी ठेवत आहे. नंदीसमोरील तळघरामध्ये अस्वच्छता होती. तेथे स्वच्छता करण्यात आली. यंत्राद्वारे ज्ञानवापी परिसराची त्रिमितीय प्रतिमा घेतली जात आहे.
३. ज्ञानवापीचे सर्वेक्षण सकाळी ७ ते दुपारी साडेबारापर्यंत झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच नंतर सायंकाळी ५ पर्यंत करण्यात आले. पुरातत्व विभागाचे ६१ जण या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत. सर्वेक्षणाच्या वेळी ज्ञानवापीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
४. तळघराची चावी देण्यास प्रथम मुसलमान पक्षाने नकार दिला होता; मात्र प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर चावी देण्यात आली. त्यानंतर तळघर उघडण्यात आले.