Home स्टोरी जोहान्सबर्गमध्ये इमारतीत भीषण आगीत ५८ जणांचा मृत्यू!

जोहान्सबर्गमध्ये इमारतीत भीषण आगीत ५८ जणांचा मृत्यू!

267

३१ ऑगस्ट वार्ता: दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीला आज गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत आतापर्यंत ५८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे. इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार, आपत्कालीन व्यवस्थापन सेवांनी सांगितले की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आणखी ४३ लोक जखमी झाले आहेत.

 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणावर विझवण्यात आली असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.