Home स्टोरी जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान!

जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान!

255

पिडीत व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश!

२१ जुलै वार्ता: जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झालेल्या पीडित व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश ओकलंड न्यायालयाने नुकताच कंपनीला दिला. जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कॅलिफोर्नियायातील एका व्यक्तीला कर्करोग झाल्याविषयी कंपनीला ओकलंडमधील ‘डिफॉल्ट स्टेट कोर्ट’ने दोषी ठरवले. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, अँथनी हर्नांडेझ वॅलाडेझ (वय २४ वर्षे) यांना जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे अतीदुर्मिळ असा ‘मेसोथेलियामा’ कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. ‘मेसोथेलियामा’ हा शरिरातील अवयवांच्या पृष्ठभागावर निर्माण होतो. सामन्यतः अ‍ॅसबेस्टॉस खनिजाच्या संपर्कात आल्यावर हा कर्करोग होतो. वॅलाडेझ यांनी लहानपणापासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा टॅल्कम पावडरचा वापर केल्याने त्यांना कर्करोग झाल्याचे अँथनी हर्नांडेझ यांनी म्हटले होते. जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनांविषयी यापूर्वी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कंपनीला हानीभरपाई द्यावी लागली आहे.