Home स्टोरी जे काम कराल ते मन लावून व प्रामाणिक पणे करा यश तुमचेच...

जे काम कराल ते मन लावून व प्रामाणिक पणे करा यश तुमचेच आहे..! पोलीस निरीक्षक अविनाश शिंदे

155

दुकानवाड वार्ताहर: जे काम कराल ते मन लावून व प्रामाणिक पणे करा यश तुमचेच आहे. असे आवाहन पुणे पोलिस शाखेचे पोलीस निरीक्षक व वसोली गावचे सुपुत्र अविनाश शिंदे यांनी केले, ते को. ए. सो. यशवंत रा. परब विद्यालय वसोली येथील विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.

मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस, एस, सी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचा गुण गौरव शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धडे, माणगाव बीटचे हेड कॉन्स्टेबल सखाराम भोई, अविनाश शिंदे यांच्या मातोश्री, शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, जयप्रकाश परब, विश्वनाथ शिंदे, रमेश शिंदे, प्रसाद परब, वसंत खोचरे, राजेंद्र घाडी, वसोली पोलिस पाटील ऋतुजा कडव,साकीडे॑ पोलिस पाटील राजन राणे, उपवडे पोलिस पाटील जिजानंद शेडगे, रवींद्र कडव युवा सेना उपाध्यक्ष स्वप्निल शिंदे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब, शिक्षक पी. आर. कोकीतकर, वाय एन वारंग विद्यार्थी पालक उपस्थित होते.

विद्यार्थांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी आपण अथक परिश्रम करून यशाचे शिखर कसे गाठले त्याची माहिती दिली, परीस्थिती कोणतीही असो त्यावर मात करणे आपले कौशल्य आहे. या सत्कारातून प्रेरणा घेऊन यशाचे शिखर गाठा, गावाचे नाव उज्वल करा, वसोली सारख्या भागात शिकुन या शाळेतून अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत या शाळेचा अनेक वर्षे १० वीचा निकाल १०० टक्के लागत आहे हे ऐकून छाती अभिमानाने फुगून येते. असेच नाव लौकीक करा असे आवाहनही केले. यावेळी श्रद्धा घाडी, प्रज्वली गुरव, प्रमिली गुरव, सिम्रण राऊळ, हर्ष परब, अथर्व तवटे, कार्तिक कदम, आदित्य राऊळ, धीरज मेस्त्री, कृष्णा कुर्लेकर, मुख्याध्यापक अजित परब, शिक्षक पी आर कोकीतकर, वाय एन वारंग, शिपाई दिगंबर तवटे यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाखेच्या वतीने अविनाश शिंदे व त्यांच्या मातोश्री यांचा ही सत्कार करण्यात आला.