Home स्टोरी जेष्ठ क्रीडा संघटक श्री अशोक दाभोलकर-मेस्त्री व शशिकांत गवंडे ” प्राईड ऑफ...

जेष्ठ क्रीडा संघटक श्री अशोक दाभोलकर-मेस्त्री व शशिकांत गवंडे ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने सन्मानित

108

मालवण प्रतिनिधी: 

भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून कर्तव्यम प्रेरणा फाऊंडेशन, पुणे व शंभूराज्याभिषेक ट्रस्ट ह्यांच्या विद्यमाने श्री संतोषभाऊ वारणे ह्यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित केलेल्या १५ व्या अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासम्मेलन २०२३ मध्ये युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या माता, पत्नी तसेच विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्यात क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांना व्यक्तीगत चर्चासत्र तसेचं लेखणीतून क्रीडा संस्कृती प्रबोधन तसेच ग्रामीण भागातील माताभगिनी सामाजिक क्षेत्रात पुढे याव्यात यासाठी गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवित निस्वार्थपणे काम करणारे दाभोली वेंगुर्लाचे क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक गणेश दाभोलकर -मेस्त्री ह्यांना कारगिल युद्धात भीमपराक्रम करून भारतीय सेनेचा मानाचा महावीर चक्र पुरस्कार प्राप्त कमांडो मा. श्री. दिगेद्र कुमार ह्याचे शुभहस्ते ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने” फेटा, मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करून स्पर्धा आयोजन, पंच व मार्गदर्शक आदी विविध अंगाने खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून गेली कित्येक दशके झोकून काम करणारे उभादांडा वेंगुर्ल्याचे शशिकांत आत्माराम गवंडे ह्यांना मा. श्री. कृष्ण प्रसाद ( IPS, ADGP) ह्यांचे शुभहस्ते फेटा, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने ” गौरविण्यात आले.

वीरमरण आलेल्या जवानांना पुष्पचक्र व मानवंदना देत सैनिकी शिस्त व सैनिकी वातावरणात अतिशय सुंदरपणे संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमात मा. श्री. संजीव जैन ( संचालक जी -२०, नवी दिल्ली, भारत सरकार), ब्रिगेडीयर श्री. राजेश गायकवाड, श्री. अतुल जे. निकम ( संचालक- नेहरू क्रीडा केंद्र, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), महाराजा श्री शिवाजी जाधव, महाराजा श्री. विजयसिंह राजेभोसले , तंजावर), एअर मार्शल श्री. भुषण गोखले- भारतीय वायुसेना, एअर मार्शल श्री. प्रदिप बापट- भारतीय वायुसेना, एअर मार्शल श्री नितीन वैद्य – भारतीय वायुसेना, महावीर चक्र विजेते श्री दिगेद्र कुमार – भारतीय सेना, श्री. सुनील पवार ( अप्पर आयुक्त तथा संचालक -=सहकार} , महाराष्ट्र), डॉ. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते व त्यांच्या शुभहस्ते शहीद जवानांच्या माता- पत्नी तसेच अन्य कार्यवीरांना सन्मानित करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव तसेच संपादन, प्रतिथयश लेखक व मुख्य संयोजक श्री. क्रांती महाजन यांनी केले.