Home स्टोरी “जीवन विद्या मिशन” च्या ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

“जीवन विद्या मिशन” च्या ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

526

सावंतवाडी: सद् गुरु श्री वामनराव पै यांच्या जनशताब्दी निमित्त सावंतवाडी तालुक्यात २२ जानेवारी पासून त्यांच्या ग्रंथांची ग्रंथ दिंडी सुरु आहे. या ग्रंथ दिंडी मध्ये जीवन विद्या मिशन चे महाराष्ट्र राज्यातील अनेक नाम धारक सहभागी झाले आहेत. या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून सद् गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल विचार ग्रंथांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील गावोगावी पोहचवण्याचे काम सद् गुरूंचे शिष्य करत आहेत.

सद् गुरु श्री वामनराव पै एक महान समाजसुधारक, एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता आणि नाविन्यपूर्ण जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. यांचा जन्म मुंबई, भारत येथे २१ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. ते एक स्व-प्रेरित व्यक्ती होते. प्रत्येक मानवाला आनंदी बनवणे हा त्याच्या निःस्वार्थ प्रयत्नाचा एकमेव उद्देश होता. त्यांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी १९५५ मध्ये जीवनविद्या मिशन नावाची ना-नफा, नोंदणीकृत, धर्मनिरपेक्ष, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था स्थापन केली. हेच जीवनविद्या मिशन चे काम पुढे ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून जीवनविद्या मिशन चे शिष्य करत आहेत.

सावंतवाडी शहरात केसरी, दाणोली, देवसू, परपोली आणि कोलगाव या भागात ग्रंथ दिंडी संपन्न झाली. या भागात जीवनविद्या मिशन च्या ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ही ग्रंथ दिंडी २७ जानेवारी पर्यंत सावंतवाडी तालुक्यातील गावगावी राहणार आहे. या ग्रंथ दिंडीत सहभागी होऊन पुण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवनविद्या मिशनच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...असा संदेश देणारे जीवन विद्येचे शिल्पकार सद् गुरु श्री. वामनराव पै यांनी अनेक वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून समाज प्रबोधनाचे कार्य केले. हे ईश्वरा…सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण करआणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. वामनराव पै यांची ही विश्वप्रार्थना आजही अनेकांच्या ओठावर आहे.

ग्रंथ दिंडीत सहभागी होण्यासाठी संपर्क :- डॉ. निलेश अटक ९०२१८२९०८२, श्री मोचेमाडकर ९४२०२६२२१६.