Home स्टोरी जीवन लाड व ग्रामस्थांतर्फे गोठवेवाडी घाट पायऱ्या उभारणी कामाचे भूमिपूजन.

जीवन लाड व ग्रामस्थांतर्फे गोठवेवाडी घाट पायऱ्या उभारणी कामाचे भूमिपूजन.

153

सावंतवाडी प्रतिनिधी: शिरशिंगे गोठवेवाडी घाट पायऱ्या उभारण्यात येणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागात कोट्यावधी रुपयाची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर घाट पायऱ्या उभारणे तसेच मुख्य रस्ता ते मदन शिर्के घरापर्यंत चा रस्ता कडे करून टाकळीकरण करणे, डोंगरी विकास निधीतून कामे करण्यात येत आहेत. या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे उप तालुका प्रमुख श्री जीवन लाड व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. शिरशिंगे गोटेवाडीत इतिहासकालीन मन मनोहर संतोषगड आहे. या गडावर जाण्यासाठी पायऱ्या उभारणे तसेच आधी विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. रस्ते आधी विकास कामे विविध शासकीय योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन उद्घाटन गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

 

यावेळी संतोष चव्हाण, कृष्णा चव्हाण, सोमा घावरे, रामचंद्र शिर्के, सिताराम सुर्वे, वसंत शिर्के, माजी सरपंच सुरेश शिर्के, उत्तम शिर्के, बाळकृष्ण घावरे, प्रथमेश चव्हाण, अशोक शिर्के, मनोहर घावरे, दत्ताराम सुर्वे, गोविंद लाड, राजाराम शिर्के, विलास दळवी, सुभाष सुर्वे, रवींद्र शिर्के, अंकुश चव्हाण, मोहन घावरे, बाबू सुर्वे, वसंत सुर्वे, विकास दळवी, किशोर शिर्के, अनंत शिर्के, मधुकर शिर्के, संतोष पेडणेकर, रवी घावरे, गणपत सुर्वे, मधुकर शिर्के आधी उपस्थित होते.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गोठ वे वाडीत विकास कामे होत आहेत. त्याबद्दल श्री लाड यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.