Home स्टोरी जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा! पालिका...

जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा! पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन!

98

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ स्वप्न बघत बघू नका, स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्याला प्रयत्नाची जोड द्या असे विचार कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात व्यक्त केले. कल्याण पूर्व येथील कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या या पदवी महाविद्यालयात पदवीदान समारोहास आयुक्त धांगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना त्यांनी हे विचार व्यक्त केले. महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला मिळालेले मित्र-मैत्रिणी हा सगळ्यात मोठा-मौल्यवान ठेवा असून जेव्हा केव्हा तुम्ही जीवनामध्ये निराश होतात तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्यास तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते, मी स्वतःही देखील जेव्हा परळ येथील पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये जातो तेव्हा मी परत येताना पुढील आयुष्यासाठी ऊर्जा घेऊन येतो. आपणही आपल्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहून ही ऊर्जा जतन करावी असेही ते पुढे म्हणाले. पदवी नंतर पुढील स्पर्धा परिक्षां आणि उच्च शिक्षणासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झालेली पदवी प्रमाणपत्रे डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.या महाविद्यालयामध्ये सुमारे ४००० विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी २०२१-२२ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशी माहिती कमलादेवी आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे चेअरमन सदानंद तिवारी यांनी यावेळी दिली.