Home स्टोरी जि. प. शाळा नं. ६ भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप   ...

जि. प. शाळा नं. ६ भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप         

95

सावंतवाडी प्रतिनिधी: कै.लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी जि.प.शाळा नं. ६ येथे भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून भाजपच्या वतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य दप्तर व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष व शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विशाल परब यांच्यासारख्या दातृत्ववान व्यक्तींकडून आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार तसेच मुलांनी उत्तम असे अध्ययन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे आणि भविष्यात यूपीएससी एमपीएससी तसेच उच्च शिक्षण घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या शाळेचे व गुरुवर्यांचे नाव उज्वल करावे. विशाल परब यांच्यासारखे दातृत्ववान व्यक्ती आपल्या मदतीसाठी सदैव पाठीशी असतील असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमा वेळी मान्यवर माजी उपनगराध्यक्ष राजू बेग साहेब भाजप मंडल शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेचे शिक्षण तज्ञ तसेच भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, प्रभाग अध्यक्ष रवी नाईक, शक्ती केंद्रप्रमुख गोटया म्हापसेकर, अमित गवडळकर, नागेश जगताप, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव सर, शिक्षिका सायली लांबर मॅडम, शाळा व्यवस्थापनअध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.