Home स्टोरी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे...

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे रोजी संपन्न होणार

180

मसुरे प्रतिनिधी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरली या शाळेचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. ४ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वा उद्घाटन व शोभा यात्रा, दुपारी ०४.०० वा. शाळेचे शिक्षक आणि इतर मान्यवरांचा सत्कार,रात्रौ १०.०० वा.शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राची लोकधारा (आजी विद्यार्थी).५ मे २०२३ रोजीसकाळी ११.०० वा.नेत्रशिबीर आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा,रात्रौ १०.०० वा. आजी माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमशिक्षक पालक, ग्रामस्थ यांचा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा. ६ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. : श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, भजने, रात्री १०.०० वा. बाळकृष्ण दशावतार कोळंब यांचा पौराणिक नाटयप्रयोग होणार आहे.

प्रमुख अतिथीगटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर,गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी उपस्थित राहणार आहेत.उपस्थीतीचे आवाहनग्रामपंचायत वेरळ, शाळा व्यवस्थापन समिती, शतकोत्तर हिरक महोत्सव समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले आहे.