सिंधुदुर्ग: जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा “शतकोत्तर हिरक महोत्सव” सर्व आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, महिला वर्ग आणि मुंबईकर मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून दि.४ मे, ५ मे व ६ मे २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवाला आपण सर्वांनी सहकुटुंब – सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री विजय परब, उपाध्यक्ष श्री आबा परब, सचिव श्री सुरेश मापारी, अध्यक्ष -शाळा कमिटी- श्री गौतम तांबे, मुख्याध्यापक सौ. शुभदा रेडकर, शाळा शतकोत्तर महोत्सव कमिटी व जि. प. शाळा वेरली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वेरली शाळेचा “शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ४ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. उद्घाटन व शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी ०४.०० वा. शाळेचे शिक्षक आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्रौ १०.०० वा. शाळेतील आजी विद्याथ्यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. ५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. नेत्रशिबीर आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रात्रौ १०.०० वा. आजी माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शिक्षक पालक, ग्रामस्थ यांचा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. ६ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, भजने होणार आहेत. रात्री १०.०० वा.बाळकृष्ण दशावतार कोळंब यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. आप्पासाहेब गुजर, गटविकास अधिकारी, पं. स. मालवण मा. श्री. संजय माने, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मालवण मा. श्री. नंदकिशोर गोसावी आहेत.