सावंतवाडी प्रतिनिधी: जे रुग्ण अति गंभीर अवस्थेत आहेत. त्यांना चालता येत नाही. बेडवर आहेत अशा रुग्णांची काळजी घेतली जात आहे.आरोग्य विभागामार्फत अशा रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचे आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य काम करत आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असे जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर तुषार चिपळूणकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये “उपशामक काळजी” Palliative Care हे कार्यक्रमा विषयक जनजागृती व कार्यक्रमाची व्याप्ती सर्व स्तरावर वाढविण्याच्या दृष्टीने विविध आरोग्यदिनांचे औचित्य साधुन “उपशामक काळजी” Palliative Care दिवस जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णांना किट चे वाटप करण्यात आले.
Palliative Care दिवसा निमित्ताने palliative कार्यक्रमाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग मार्फत palliative विभागामार्फत स्टाफ कडून देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा बाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमा मध्ये palliative लाभार्थ्यांना MR किट व स्टिक चे वाटप जिल्हा शल्य चिकित्सक. डॉ. श्रीपाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, परिचारिका प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचारिका श्रद्धा सावंत व सूत्रसंचालन परिचारिका शिल्पा दळवी यांनी केले. यावेळी विभागाचे स्टाफ, नर्स, रुग्ण, नातेवाईक उपस्थित होते







