सावंतवाडी प्रतिनिधी: माणिक चौक वेंगुर्ला येथे सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, इयत्ता चौथीत शिकणारी कु.निधी विजय खडपकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे लहान गटात कु.निधी विजय खडपकर हिचा लावणी सम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.