मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गाबीत समाजाचे लोकजीवन या विषयावरील निबंध स्पर्धेत मालवण दांडी शाळेची विद्यार्थिनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हिला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे १५००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री अशोक तोडणकर यांच्या शुभहस्ते कु.विधिशा हीस सन्मानपत्र,सन्मान चिन्ह व रोख १५००/- रु. पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ मुंबई चे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, श्री बाबा मोंडकर, श्री अन्वय प्रभू, श्री.दाजी सावजी, श्री.नारायण धुरी श्री.महेंद्र पराडकर श्री,रुपेश प्रभू,श्री.रविकिरण तोरस्कर,श्री.तातु कुबल,श्री.पांडुरंग कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दांडी शाळेची विद्यार्थिनी कु. विधिशा कुबल हिने मिळवलेल्या या यशाबद्दल श्री.संदीप लोणे,सौ.सरोज लोणे,श्री.विरेश लोणे,दांडी शाळेच्या मुख्या,सौ.विशाखा चव्हाण ,राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री शिवराज सावंत सर, मनीषा ठाकूर ,श्री रामदास तांबे, दांडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी,श्री.दिनकर शेलटकर ,तसेच दांडी ग्रामस्थ,पालक यांनी विधिशाने मिळवलेल्या या यशाबद्दल विशेष कौतुक केले आहे. विधिशाने यापूर्वी रोटरी क्लब मालवण आयोजित जिल्हास्तरीय वत्त्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तसेच इयत्ता पाचवी मध्ये तीने शिष्यवृत्ती ही प्राप्त केलेली आहे, ज्ञानी मी होणार या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तीने तालुकास्तरीय यश मिळवलेले होते, विधिशाने मिळविलेल्या या चौफेर यशाबद्दल तीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.