सिंधुदुर्ग: दिवसेंदिवस जंगलात वानरांची संख्या वाढत आहे व त्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल याचबरोबर वानरांचा त्रास बागायतदारांना मोठ्या प्रमणावर सहन करावा लागत आहे .तरी प्रलंबित शेती सवरक्षण परवाने जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर द्यावेत यासाठी लवकरच मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे.असे राहूल सावंत(युवासेना विभाग प्रमुख मसुरे) यांनी सांगितले.