Home स्टोरी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हापरिषद अंतर्गत नागरिकांच्या समस्या आ. वैभव नाईक यांनी लावल्या...

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हापरिषद अंतर्गत नागरिकांच्या समस्या आ. वैभव नाईक यांनी लावल्या मार्गी

148

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

 

नागरिकांची विविध कामे, प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांच्या निर्दशनास आणून देत त्या तात्काळ सोडविण्यात आल्या. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तर काही समस्यांवर पाठपुरावा करण्याची ग्वाही आ.वैभव नाईक यांनी दिली.

त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विकास कामांबाबत सरपंचांच्या मागण्या मांडण्यात आल्या. ग्रा. प. स्तरावरील इतर प्रश्न सोडविण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.तर काही समस्या तात्काळ सोडविण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर,राजू कविटकर,कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर, नागेश करलकर,राहुल सावंत, अमोल वस्त आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.