Home राजकारण जिल्हाच्या राजकारणात उद्योजक विशाल परब यांची जोरदार एंट्री होणार…!

जिल्हाच्या राजकारणात उद्योजक विशाल परब यांची जोरदार एंट्री होणार…!

487

सावंतवाडी प्रतिनिधी: येत्या दीड-दोन महिन्यावर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढवावी यासाठी प्रत्येक भागात त्यांच्या मतदारसंघनिहायत्यांची ताकद असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात ओढण्याच्या दृष्टीने चढाओढ सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नगरपालिकाव जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती मध्ये सत्तेची चावी आपल्याच हातात राहावी यासाठी सत्ताधारी पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तील तीनही तालुके जिल्हा परिषद पंचायत समिती कोणाच्या ताब्यात द्यायच्या हे निर्णय ठरवणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सर्वच यांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी चाचपणी. करत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवलेले युवा नेते उद्योजक विशाल परब यांना पुन्हा पक्षीय राजकीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेले काही महिने श्री परब हे राजकारणापासून अलिप्त आहेत. आता पुन्हा त्यांना पक्षात घेऊन पक्ष बळकटीच्या दृष्टीने जवळपास सर्वच पक्षाने त्यांना आपल्याकडे ओढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे युवा नेते उद्योजक विशाल परब पुन्हा एकदा लवकरच पक्षीय राजकारणात दिसणार आहेत.

जोरदार हालचाली वेगाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. श्री परब यांनी पुन्हा पक्षीय राजकारणात सक्रिय व्हावे अशी जोरदार मागणी तरुण कार्यकर्त्यांची आहे. श्री परब यांनी अपक्ष निवडणूक लढवून जवळपास ३५ हजार मते घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बाजूने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सक्रिय करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेते प्रयत्नात आहेत.

उद्योजक युवा नेते विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात राजकीय सामाजिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकट्या स्वतःच्या हिमतीवर अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवून तरुणाईच्या जोरावर आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात विजय यश मिळाले नसले तरी त्याने पक्षीय उमेदवारांपेक्षा चांगली मते घेतली. त्यामुळे त्यांचे राजकीय पक्ष स्तरावरील वजन आता वाढले आहे. विधानसभा निवडणुकी ला जवळपास वर्ष होत आले. आता वर्षभरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल येत्या दोन तीन महिन्यांवर वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षाला स्वबळावर लढायचे झाल्यास आपल्याकडे नेत्यांची चांगली फळी हवी. या दृष्टीने भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षाने आतापासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघावर चाचपनी सुरू केली आहे. यामध्ये कणकवली, देवगड व कुडाळ मालवण मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांची आपल्या पक्षात प्रवेश प्रक्रिया घेऊन पक्ष बळकटीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ते आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ असा आहे की जेथे तीन पंचायत समिती व दोन नगरपालिका व ११ जिल्हा परिषद सदस्य निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे हे तिन्ही तालुके कोणाची सत्ता जिल्ह्यात कायम ठेवणार? हे निर्णायक असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही पक्ष आता ताकतीने स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. भाजपकडे सध्या या मतदारसंघात प्रभावी नेता ची उणीव आहे. तसेच शिवसेनेकडे आमदार दिपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा प्रवक्ते सचिन वालावलकर असे नेते आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे सद्यस्थितीत जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ दोघेजण दिसत आहेत. भाजप पक्ष कडे पूर्वी माजी नगराध्यक्ष संजू परब व त्यांची टीम होती. आता भाजपकडे जुने कार्यकर्ते यांची फळी आहे. त्यात जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा चिटणीस महेश सारंग, प्रमोद कामत, युवराज लखम सावंत भोसले, राजन मापसेकर ही टीम आहे. त्यामुळे एकंदरीत या तिन्ही पक्ष चे वरिष्ठ आपल्या पक्षा ही ताकद अधिक बळकट करण्याची दृष्टीने जुने नवे कार्यकर्ते व नेते आपल्या पक्षात कसे आणता येईल?  या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. असे समजते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडे माजी आमदार राजन तेली हेही आता लवकरच सक्रिय होणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या व अपक्ष निवडणूक लढवलेल्या अर्चना घरे परब हेही शांत आहेत. त्यांनीही सक्रिय व्हावे या दृष्टीने महिला वर्गात आग्रह आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय उलथापालतीला वेग येणार आहे. येत्या काही दिवसात पक्ष पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आता पक्षीय स्तरावर. बळकटीच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.

विशाल परब यांची लवकरच इंट्री होणार.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या एक दशक भर त्यांनी सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात मोठे इव्हेंट करून पर्यटन जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. सावंतवाडी मध्ये त्यांनी जुबिन नौटियाल तसेच इंदुलकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असे मोठे कार्यक्रम घेतले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी गावागावातील अनेक मंडळे तरुण वर्गाला शैक्षणिक रोजगार पशुसंवर्धन कृषी अधि विविध उपक्रमांसाठी सढळ असते मदत केली आहे. श्री स्वामी समर्थ मठ उभारणी असे दानशूर व्यक्तिमत्व असलेले युवा नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना विचारमंथन करायला लावले होते. एक हाती पक्षाचा झेंडा घेऊन त्याने आपले बुरुज राखण्यात यश मिळवले. त्यानंतर. अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे ते राजकारणापासून काही शांत राहिले आहेत. त्यांनी आपल्या उद्योग धंदा व सामाजिक अध्यात्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. त्यामुळे ते सध्या पक्षीय राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी श्री विशाल परब यांना आपल्या पक्षात सक्रिय करा. अशी मागणी पक्षीय स्तरावर करण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ आणि त्या दृष्टीने तशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. परब यांचे भाजपच्या दिल्ली स्तरावर चांगले संबंध आहेत. श्री परब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी ही चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजप मूळ पक्षात ते पूर्वी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर हे पद गोठवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना व त्यांचे एकंदरीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ताकद ओळखता भाजप त्यांना आपल्या पक्षात पुन्हा सक्रिय करण्याच्या दृष्टीने विचारात आहेत. तर परब यांची एकंदरीत कार्यपद्धती पाहता त्यांना शिवसेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, अशा पक्षाकडूनही सक्रिय होण्याच्या दृष्टीने आपल्या पक्षात त्यांनी यावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत आता होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विशाल परब सक्रिय राजकारणात लवकरच त्यांची इंट्री होणार आहे. अशी शक्यता आहे.

भाजपमध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा निहाय पक्ष पातळीवर स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात होण्याच्या दृष्टीने कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या मित्र पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांनाही ते भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. शिवसेनेचे नेते बुडगुजर यांना पक्ष स्तरावरच विरोध होता. पक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ही नाराजी होती. असे असतानाही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिल्ली दरबारी वरून त्यांनाही प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पक्ष पातळीवर आता भाजप कुठलेही विरोध जुमानून भाजप पक्ष वाढीच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचेही विशाल परब यांच्या कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. त्यांचे वडील प्रभाकर परब व त्यांचे सासरे श्री परब यांच्याशीही चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. श्री विशाल परब नेमके आता पुढील त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. एकंदरीत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय स्तरावर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार इनकमिंग आउटगोइंग सुरू होणार आहे. विशाल परब हे नेमके सध्या आहेत कुठे? काय करत आहेत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सिंधुदुर्ग  जिल्ह्याच्या एका प्रमुख वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हि बातमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर प्रसारित करण्यात आली आहे.