Home शिक्षण जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा चीले हीने केले तिहेरी यश संपादन

जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा चीले हीने केले तिहेरी यश संपादन

334

सावंतवाडी: ग्रामीण भागात शिक्षणाच्या कोणत्याही आधुनिक सोई सुविधा उपलब्ध नसताना फक्त जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा संतोष चीले हीने तिहेरी यश संपादन केलं आहे. गाव खेड्यात राहणारी ही मुलगी जिथे चांगला रस्ता शुद्धा नाही, पावसात तर अक्षरशहा चिखल तुड़वत पायी प्रवास करवा लागतो या सर्व संकटानवर मात करून श्रद्धा संतोष चीले  हीने १० वी मध्ये ९४. ६० टक्के मिळवून यश संपादन केले आहे. तसेच नवोदय विद्यालयची परीक्षा पण दिली आणि या परीक्षेत पण तिने यश चांगलं मिळवीले. त्यामुळे तीचे ११ वी साठी नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळाला.तसेच आपला छंद जोपासत तीने हार्मोनियम ची चौथी परीक्षा देऊन त्या परीक्षेत पण उतीर्ण झाली. एकाच वेळी अभ्यासात सातत्य राखत तिने जे तिहेरी यश संपादन केले ते  खरोखरच कौतुकास्पद आहे.