उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे):रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या सभेचा कार्यक्रम व विद्यालयात नवीन नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल चे ज्येष्ठ सदस्य ,माजी खासदार रामशेठ ठाकूर हे लाभले होते .त्यांनी आपल्या मनोगतात जासई शाखेबद्दल गौरोउद्गार काढले .आणि या विद्यालयातील जुनी मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणीची अडचण लक्षात घेऊन या विद्यालयास नवीन इमारतीच्या उभारणी साठी ५० लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर केली . रामशेठ ठाकूर यांचे या विद्यालयास नेहमीच भरघोस मदत मिळत आहे,यापूर्वीही त्यांनी या विद्यालयास भव्य प्रशासकीय इमारत बांधून दिली आहे. तसेच अनेक अडीअडचणींमध्ये ते नेहमीच मदत करत आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन पवार उपस्थित होते त्यांनी विद्यालयाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीबद्दल विद्यालयाचे गुणगौरव केले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील यांनी दि.बा. पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी पूजन केले. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी केले आणि त्यांनी आपल्या प्रस्ताविकात विद्यालयाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली . तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील गुणवंत शिक्षक प्रा.अतुल पाटील व पाटील एस.सी.यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला . विद्यालयातील गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते केले गेले.या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी आर.पी.ठाकूर,लोकनेते दी.बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर पाटील, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोडगे सर,तसेच लाईफ मेंबर रवींद्र भोईर, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे, नरेश घरत ,प्रभाकर मुंबईकर, यशवंत घरत ,रघुनाथ ठाकूर ,पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिक ,पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख ,प्रा.अतुल पाटील,प्रा. तोरणे सर यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस .एस .यांनी केले.