४ सप्टेंबर वार्ता: जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून, लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून, कडक कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. त्याचप्रमाणे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसेच राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचा निर्वाळाही शिंदेंनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही तिघांनी लाठीमाराचा आदेश दिला, हे सिद्ध करून दाखवा, ताबडतोब राजकारण सोडून देऊ, असं वक्तव्य केलंय
मराठा आरक्षणासंदर्भात आज मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अखेर संपली आहे. या बैठकीमुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.
लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून झाले असा समज लोकांमध्ये निर्माण केला जात आहे. गोवारी मारले गेले तो आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळला जो मृत्युमुखी पडले होते तेव्हा ते आदेश तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी आदेश दिला होते का? त्यावेळी मग का राजीनामा दिला नाही? असा सवाल फडणवीसांनी केल आहे. सरकार हे करतय हे दाखवण्याचा प्रयत्न होता लोकांना देखील कळतंय हे राजकारण सुरू आहे.2018 साली आपण कायदा केला उच्च न्यायालयाने तो कायदा मान्य केला. देशात फक्त तमिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारचा कायदा केला. आमचे सरकार बदललं आणि 9 सप्टेंबरला 2020 ला स्थगिती आली. उद्धव ठाकरे एक वर्षे मुख्यमंत्री होते. 2021 पासून उद्धव ठाकरे तुम्ही वटहुकूम का काढला नाही? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.