Home स्टोरी जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर.!

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर.!

126

जालना: जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. राज्य सरकारने लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता संपुर्ण घटनेची दखल गृहखात्याने घेतली आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे.