सिंधुदुर्ग: ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्यासाठी जारमधून पाण्याची विक्री केली जाते. ही विक्री करतांना पाण्याची शुद्धता आणि स्वच्छता यांविषयी पडताळणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे यापुढे जारमधून पाणी विकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्यावी लागणार आहे. याविषयीचा मसुदा सिद्ध करण्याची सूचना अन्न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकार्यांना केली आहे.







