Home राजकारण जर तुम्ही मर्द असाल तर आमच्याविरोधात रस्त्यावर या! नरेश म्हस्के

जर तुम्ही मर्द असाल तर आमच्याविरोधात रस्त्यावर या! नरेश म्हस्के

88

आम्ही मर्द आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरे करतात. जर तुम्ही मर्द असाल तर आमच्याविरोधात रस्त्यावर या, मुलीला भडकावून, माथी फिरवून अशी कृत्य करू नका. ती तुमच्या अंगलट येतील. तुम्ही मर्द असाल तर सामोरे या. लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. स्वत: ठाण्याचे खासदार ठाण्याची बदनामी करत आहेत. त्यांना जनता मतदानातून जाब विचारेल. एका महिलेला पुढे करून काय लढतायेत. मर्द असाल तर समोर या. आम्हीदेखील शिवसैनिक आहोत. महिलांना प्यादे, हत्यार बनवून वापर करू नका. महिलेचा आधार कशासाठी घेता? असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. अतिशय बालिशपणे आणि चुकीच्या पद्धतीने कांगावा केला जात आहे. एका महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोशल मीडियावर सातत्याने ती महिला देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपा-शिवसेना नेते यांच्यावर सातत्याने घाणेरड्या भाषेत व्यक्त होते. भाजपा नेते चोर आहेत. डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते. एप्रिल फूल म्हणजे नरेंद्र मोदी. सर्वच नेत्यांवर लाच्छनांस्पद वक्तव्य ती वारंवार करत होती. महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मातोश्री आणि खासदार राजन विचारे काम करतायेत असा आरोप त्यांनी केला. तसेच कालच्या गोंधळात कुठलीही मारहाण झाली नाही. ती चालत स्वत: पोलीस स्टेशनला गेली. त्यानंतर प्लॅनिंगनुसार खासगी रुग्णालयात दाखल झाली. सरकारी दवाखान्याचा रिपोर्ट या महिलेला कुठेही अंतर्गत जखम नाही असा रिपोर्ट आला आहे. माध्यमांसमोर या लोकांचा खोटेपणा उघड झाला आहे. या महिलेची चाचणी केली असता ती गर्भवती नसल्याचे समोर आले. केवळ महिलेला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा फायदा चांडाळ चौकडी करत आहेत असंही म्हस्के म्हणाले.