Home स्टोरी जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक १ अर्थासहित

जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक १ अर्थासहित

72

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचामुळारंभ आरंभ तो निर्गुणाचानमू शारदा मूळ चत्वार वाचागमू पंथ आनंत तो. राघवाचा ||१||

अर्थ: गणेश, जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वती, जी चारही वाणींची मूळ आहे. तिला नमन करू आणि मग श्रीरामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू.समर्थ सुरुवात करतात ती मंगलाचरणाने. आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून मगच शुभारंभ करतो. ही आपली संस्कृती आहे. समर्थ रामदासस्वामीनी देखील पहिल्या श्लोकात प्रथम श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता सरस्वती हिला वंदन केले आहे. पहिल्या ओळीत सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव असे संबोधले आहे. देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण, निराकार मानले जातात. दुसऱ्या ओळीत ते म्हणतात हा गणेश म्हणजे निर्गुणाचे मूळ, म्हणजेच देवाधिदेव आहे. तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा (सत्व, रज, तम या त्रिगुणांचा) आणि निर्गुणाचा मूळ आहे त्याला आणि चारही वाचांची (परा/घोष, पश्यंती/ध्वनी, मध्यमा/नाद आणि वैखरी/आकार अशा या चार वाणी किंवा वाचा आहेत) जननी असलेल्या सरस्वती देवीला वंदन करुया आणि मग प्रभू रामचंद्राच्या अनंतकाल अबाधित रहाणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करू या.