Home क्राईम जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार! महाराष्ट्रातील २ कामगारांवर आतंकवाद्यांकडून गोळीबार….

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार! महाराष्ट्रातील २ कामगारांवर आतंकवाद्यांकडून गोळीबार….

109

२० जुलै वार्ता: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रणरेषेजवळ १९ जुलैच्या सकाळी घुसखोरी करणार्‍या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके रायफली आणि ६ हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. १८ जुलै या दिवशी अनंतनाग जिल्ह्यात आतंकवाद्यांनी महाराष्ट्रातील अक्षय आणि सौरव या २ हिंदु कामगारांवर गोळीबार केला होता. यात हे कामगार घायाळ झाले होते. ते एका दागिन्याच्या दुकानात काम करतात. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‘कश्मीर फाइट’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.