Home स्टोरी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

134

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेली ही तिसरी चकमक आहे.५ ऑगस्टला राजौरीतील खवास भागात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी मारला गेला होता. कुलगाममध्ये ४ ऑगस्टला सायंकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगामच्या हलान जंगलात आतंकवाद्यांनी सैन्याच्या तंबूवर गोळीबार केला.