Home स्टोरी जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख...

जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा…..

232

जम्मू: बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस २५० मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली.