Home स्टोरी छोट्या दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा!कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती….

छोट्या दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा!कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती….

232

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. ६ जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो.स्वराज्याची राजधानी रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे २५ सेमी १२ सेमी आकाराचे हाताने दगडावर सर्वात लहान चित्र रेखाटले आहे ते वराडकर हायस्कुल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी!

दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा

दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना चांदरकर याना अनेक अडचणी आल्या. हे चित्र रंगवण्यासाठी ऍक्रेलिक कलरचा वापर त्यांनी केला. चित्र पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागला. चित्रातले बारकावे दाखवण्यासाठी ०० नंबरच्या ब्रशचा वापर केला. संपूर्ण जगभर आज ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा होत असताना समीर चांदरकर यांच्या दगडावर साकारलेल्या या कलाकृतीचे शिवप्रेमी जनतेमधून कौतुक होत आहे.

छोट्या दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा!