छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या राड्याप्रकरणी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी १० पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाद्वारे राडा करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. किराडपुरा राडा प्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापैकी आठ जणांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे. त्या आठजणांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींना अटक करण्यात येते आहे. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण प्रमुख आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे.
आतापर्यंत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपींची नावं पुढीप्रमाणे आहेत.
बरकत शौकत शेख (वय 23 वर्षे रा. यासीन मस्जिद जवळ, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर), शेख अतिक शेख हारूण (वय 24 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, छत्रपती संभाजीनगर), सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (वय 33 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख खाजा शेख रशिद (वय 25 वर्षे रा. खासगेट, छत्रपती संभाजीनगर), शारेख खान इरफान खान (वय 23 वर्षे रा. राजाबाजार शकिल भाई यांचे घरात, छत्रपती संभाजीनगर), शेख सलीम शेख अजीज (वय 25 वर्षे रा. सेंदुरजण, सिंदखेडराजा जि. बुलढाणा), सय्यद नूर सय्यद युसूफ ( वय 30 वर्षे रा. सिकंदर हॉल जवळ, ग.नं. 6, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख नाजीम शेख अहेमद (वय 24 वर्षे रा.तुबा मस्जिद जवळ, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपींचे नावं आहेत.