Home स्टोरी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ.

112

६ ऑगस्ट वार्ता: येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ झाला आहे. लवकरच संग्रहालयाच्या अंतर्गत फर्निचरचे काम पूर्ण होऊन संग्रहालय प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.अभिरक्षक प्रवीण शिंदे पुढे म्हणाले की, संग्रहालयातील १६ व्या ते १८ व्या शतकातील पुरातन लाकडी नक्षीदार मेणा, लाकडी देव्हारा, नक्षीदार पालखी, राजघराण्याची छत्री, वाळ्याचे पंखे, तत्कालीन महिलांची पुरातन चोळी आदी वस्तूंचे हवेतील तापमान, आर्द्रता आदींचा परिणाम होऊन त्या जीर्ण होऊन खराब होऊ नयेत, त्यांचे आयुष्य अजून १०० वर्षे टिकून रहावे, यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धन प्रक्रिया चालू आहे.