शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नागरीकांना दिला दिलासा!
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – वालधुनी नदीपात्रातील गाळ पुर्ण क्षमतेने काढला गेला नसल्याने नदीपात्राची जराशा पावसाने पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होउन नदीकिनारी असलेल्या नागरीकांच्या काही घरात पाणी घुसले. या नैसर्गिक संकटाची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बाधीत ठिकाणी धाव घेवून नागरीकांना मोठा दिलासा दिला. गेल्या २४ तासात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागातील नागरी वस्तीत पाणी तुंबण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत त्यातच पावसाळ्या पूर्वी वालधुनी नजिकच्या उल्हास नदीपात्रातील गाळ पुर्ण क्षमतेने काढला गेला नसल्याने जराशा पावसाने या परिसरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन काही रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसले. या घटनेची खबर लागताच महेश गायकवाड यांनी छगपती शिवाजी नगर – वालधुनी परिसराकडे धाव घेवून ज्या घरात पाणी घुसले त्या घरांची पहाणी केली. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक आयुक्त सौ. सविता हिले यांना या परिसरात पाण्याचा वेळीच निचरा होण्यासाठी व भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून तातडीने योग्य त्या उपाय योजना करण्याची सुचना केल्या.