सावंतवाडी: सावंतवाडी शहरात काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील पाटील या व्यक्तीने सिंधुदुर्ग जिल्हातील काही व्यक्तींना हाताशी धरून छत्रपती फायनान्स नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत लोकांना लाखो रुपयाचे लोन देण्याचे सांगण्यात आले. मात्र हे लोन देण्यापूर्वी एक अट होती ती अशी की ज्या लोकांना लोन पाहिजे त्या लोकांनी जेवढे लोन पाहिजे त्या लोन ची प्रथम दहा टक्के अमाऊंट भरली पाहिजे. अर्थात जर ५ लाख रुपये लोन पाहिजे असेल तर ५२ हजार रुपये प्रथम कंपनीकडे भरले पाहिजेत अशाप्रकारे कित्येक लोकांकडून लोन देतो असे सांगून ५२ हजार रुपये घेतले गेले आणि कोकणातील लोकांची फसवणूक करून सध्या छत्रपती फायनान्स चालवणारे प्रभू कोल्हापूर येथील पाटील हे व्यक्ती गायब असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गैरप्रकार घडल्यानंतर फसवणूक झालेल्या लोकांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मनसे पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी छत्रपती फायनान्सच्या सावंतवाडी येथील कार्यालयाला भेट देत पाटील या व्यक्तीशी संपर्क साधला आणि पाटील याला तात्काळ सावंतवाडीत येऊन लोकांचे पैसे देण्यास सांगितले. छत्रपती फायनान्स चालवणाऱ्या पाटील या व्यक्तीने रात्री दहा वाजेपर्यंत येण्याची आश्वासन दिले परंतु रात्री उशिरापर्यंत पाटील आले नाही तसेच पाटील यांचे कोणतेही कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे मनसेने आक्रमक होत छत्रपती फायनान्स येते कार्यरत असलेल्या आपल्या जिल्ह्यातील अमित कवठणकर आणि प्रसाद कल्याणकर यांना धारेवर धरलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये किती लोकांचे पैसे देणे आहेत याबाबत माहिती काढून घेतली आणि छत्रपती फायनान्स चालवणारे पाटील तसेच प्रसाद कल्याणकर आणि अमित कवठणकर यांना पैसे लवकरात लवकर देण्याबाबत समज दिली आणि असं न केल्यास योग्य ते कारवाई करण्यात येणार असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित माहिती सध्यातरी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढे मनसे पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.