Home क्राईम छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार पोलिसांच्या ताब्यात!

छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार पोलिसांच्या ताब्यात!

257

११ जुलै वार्ता: उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एका तरुणाला महाड जि. रायगड येथून अटक केली आहे. छगन भुजबळ पुण्यात दौऱ्यावर असताना हा धमकीचा फोन आल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरून त्या तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले आहे. संबंधित तरुणाने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे आणि सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि कोरेगाव पार्क पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.