Home स्टोरी चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

298

सावंतवाडी प्रतिनिधी: व्यापारी गाळे काढण्यासाठी मालकाने चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. याविषयीं कारीवडे ग्रामपंचायतीने पंचयादी घालून गाळे मालकाला गटार काढण्याच्या सूचनाही दिल्या. तहसिलदार तसेच गटविकास अधिकारी यांनीही याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते . मात्र याविषयीं गेले वर्षभर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे संबंधित गाळे मालकासह ग्रामपंचायतने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर मंगळवारी दि. १५ ऑगस्ट दिवशी दत्ताराम विष्णू गावडे यांनी उपोषण छेडलेले होते. या उपोषणाला तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्य आले
याविषयी दत्ताराम गावडे यांना देलेल्ल्या पत्रात म्हटले कि, तहसीलदार सावंतवाडी यांचे दालनात चर्चा ग्रामविकास अधिकारी, कारिवडे यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस ग्रामविकास अधिकारी, कारिवडे व उपोषणकर्ते उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेवेळी ग्रामविकास अधिकारी, कारिवडे यांना श्री. धर्माजी नारायण गावडे यांना ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील तरतुदीनुसार नोटीस देणेच्या सूचना देणेत आल्या तसेच अनधिकृत बांधकामाबाबत नियमाधीन कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना देणेत आलेल्या आहेत.
तथापि, सदर बाबतीत अद्याप कोणतीही कार्यवाही न झालेने उपोषणकर्ते अद्याप उपोषणस्थळी बसलेले आहेत. तरी आपण आपले स्तरावरून अर्जदार यांना त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने समर्पक उत्तर लेखी स्वरुपात द्यावे व उपोषणकर्त्यास उपोषणापासून परावृत्त करावे. अर्जदार उपोषणापासून परावृत न झालेस व कोणताही अनुचित प्रकार पडलेत त्याची सर्वस्वी जबाबदारी आपले कार्यालयाची राहील याची कृपया दखल घेणेत यावी.