Home स्टोरी चौकूळ गावातील मधुकर गावडे यांचा सावंतवाडी मोती तलावात बुडून मृत्यू.

चौकूळ गावातील मधुकर गावडे यांचा सावंतवाडी मोती तलावात बुडून मृत्यू.

371

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर बसलेले चौकूळ मराठी वाडी येथील मधुकर विठ्ठल गावडे वय ६३ यांचा तोल जाऊन ते तलावात पडले होते. काल रात्री अकरा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच हा प्रकार घडला होता. सावंतवाडी नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र आज सकाळी नऊ वाजता तलावातील मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

सदर मृतदेहाची ओळख पटली असून चौकुळ येथील मधुकर विठ्ठल गावडे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले मुंबई येथे राहतात. यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तोल जाऊन ते पाण्यात पडले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोती तलावात पडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक मापसेकर व त्यांच्या टीमने व पोलीस यंत्रणे एकत्रित मोहीम हाती घेतली. तब्बल नऊ ते दहा तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले.

पोलीस अधिकारी गजानन भालेराव, पोलीस हवालदार मनोज राऊत, अनिल धुरी हे अधिक तपास करत आहेत. मोती तलावात काल ११ दिवसाचे गणपती विसर्जनाच्या वेळी नगरपालिका कार्यालयाच्या समोरील तलावाच्या काठी बसलेले श्री गावडे यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले होते. मात्र सदर व्यक्ती कोण याचा शोध लागला नव्हता. मात्र मृतदेह मिळाल्यानंतर ओळख पटली आहे.