कोकणातील शिक्षण क्षेत्रातील आयडॉल डॉराजेंद्र जगन्नाथ गावडे….!
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक आगळावेगळं व्यक्तिमत्व….!
सावंतवाडी प्रतिनिधी: नवी मुंबईतील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र उर्फ राजू गावडे हे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला एक हिरा आहे. त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात ज्या काही पदव्या प्रदान केल्या आहेत. त्यातून आजच्या तरुण पिढीला ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत. कोकणच्या लाल मातीतील हा हिरा आम्हाला गवसला यातच खरे आम्ही भाग्यवान आहोत. असे अनेकांनी प्रा. डॉ. राजेंद्र गावडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडीत त्याने मित्रपरिवारांसोबत बोलताना मी एक साधा तुमच्यातला एक आहे. मी वेगळं असं काहीच केलं नाही जे मला माझ्या वाटचालीत करता आलं ते मी करत गेलो आणि त्यातून एक शिक्षण क्षेत्रातील पदव्या मला प्राप्त करता आल्या. हे सर्व माझे कुटुंब आणि तुम्हा मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळेच. तुमचे असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत कायम राहू दे. तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला याने मी अक्षरशः भारावून गेलो आहे. यातून वेगळी प्रेरणा मला मिळाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रा. श्री. गावडे यांच्यावर प्रत्यक्ष भेटून, फोनवर, सोशल मीडियावर, जिल्हाभरातून तसेच महाराष्ट्रातून अनेक शिक्षण क्षेत्रातील व त्यांच्या मित्रपरिवार स्नेही राजकीय सामाजिक क्षेत्रातील माजी आमदार ॲड. अजित गोगटे आधी अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. डॉ. राजेंद्र जगन्नाथ गावडे यांचा साठावा वाढदिवस केक कापून मित्रपरिवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राजेंद्र गावडे यांना केक भरवून व पुष्पगुच्छ देऊन एल.आय.सी. चे माझी डेव्हलपमेंट ऑफिसर प्रमोद भागवत व सोमनाथ गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
ॲड. राजाराम गावडे, माजी प्राचार्य सुरेश गावडे, अरुण वझे, विश्वनाथ राऊळ, ॲड.संतोष सावंत, ॲड संग्राम गावडे, भरत गावडे, लक्ष्मण गावडे, उमेश गावडे, कृष्णा गावडे, विजय गावडे, रमेश डांमरेकर शरद परब, सौ. परब, आनंद नार्वेकर, विवेक मुथाली, गुरुदास गवस हनुमंत मालवणकर शशिकांत गावडे बाळ पुराणीक, मिलिंद देसाई, डॉ. भूषण सावजी, डॉ. बी.जी. देसाई, नंदू चिंदरकर, नारायण देसाई, विवेक पालम, विजय सावंत, डॉ. रवी किरण गोवेकर, सुभाष पुराणिक, रविकिरण परब, समीर गोसावी, वामन राऊळ तसेच सुंदरवाडी ग्रुप मधील संजू पै, गोपाळ गाडगीळ, सौ. सीमा जाधव, रवींद्र महाबळ, अनिल ठाकूर, चंद्रकांत मळीक, रामचंद्र वाडकर, आदिने शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर गावडे म्हणाले की, मी लहानाचा मोठा सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीच्या भूमीत झालो. मला माझ्या शालेय व कॉलेज जीवनात जे अनुभव मित्रमंडळी कडून मिळाले त्यातून मी घडत गेलो. खरतर श्री पंचम खेमराज महाविद्यालयात सन १९८५ च्या तृतीय वर्ष बी.एस.सी. फिजिक्स बॅचचा मी विद्यार्थी, मी महाविद्यालयात असताना जी. एस. च्या निवडणुकीला उभा राहिलो होतो आणि त्यावेळी मला जे मित्र भेटले ते अजूनही माझ्यासोबत आहेत. मला माझे आई-वडील आणि पत्नी मुलं तसेच सर्वांचे सहकार्य मला या सर्व क्षेत्रात काम करताना मिळाले. मी इंजिनिअरिंग कॉलेजला वीस वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत आहे. तेथील सर्व स्टाफ यांचे सहकार्य मला मिळत आहे. मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाले. एक साधा माणूस म्हणून जगताना माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव झाला हे खरंच माझ्या दृष्टीने एक प्रेरणादायी आहे. यातून मला खूप काही शिकता आलं आहे. हे शुभेच्छा रुपी आशीर्वाद मला लाभले हे माझं खरंच भाग्य आहे असे ते म्हणाले.
यावेळी एडवोकेट राजाराम गावडे, माजी मुख्याध्यापक सुरेश गावडे, माजी मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ, रमेश डामरेकर, प्रमोद भागवत आदींनी हे व्यक्तिमत्व खरंच आगळे वेगळे असे आहे. मैत्री कशी निभवावी हे डॉक्टर राजेंद्र गावडे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी मित्रपरिवार जपला त्याची ठेवण उत्तम ठेवली आहे. त्यामुळेच तो आपल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मार्गदर्शक असे आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी निश्चित त्यांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.